Thursday, 13 October 2016

जातीचे वास्तव

'जातीचे वास्तव......!
- डाॅ. चन्द्रहास सोनपेठकर

            'जात' हे वास्तवच समजत असाल; तर आणखी एक वास्तव समजून घ्यायला हवं. प्रत्येक जातीत चांगले-वाईट, गरीब-श्रीमंत, प्रतिभावान-सामान्य अशा सर्वच प्रकारची माणसं असतात.
           एकाच जातीतील माणसे कधी कधी परस्परांना मदत करीत नाहीत. पण तुमच्यापेक्षा अन्य जातीची व्यक्ती तुम्हाला मदत करते.
           एखाद्या जातीची एक व्यक्ती तुम्हाला मदत करते. त्याच जातीची दुसरी व्यक्ती तुम्हाला मदत करीतही नाही. मदत करणे/नाकारणे हा व्यक्तीच्या स्वभावाचा भाग असू शकतो; जातीचा नाही.
           जात पाहून एखाद्याचा आदर/अनादर करता येणार नाही. त्यासाठी व्यक्तीचे वर्तन अधिक महत्वाचे ठरते.
           जात जात करणा-या माणसांच्या विकासाला मर्यादा असते. एका विशिष्ट टप्प्यानंतर अशा लोकांचा विकास नक्कीच थांबतो.
           राष्ट्राच्या जडणघडणीत सर्वांचे योगदान महत्त्वाचे ठरते. सर्वांना विकासाच्या संधी मिळायला हव्यात. व्यक्ती-समाज-राष्ट्र असा विकास घडणं आवश्यक आहे.
           आपण या विचारांशी सहमत असलं पाहीजे, असा आग्रह मुळीच नाही. सर्व संत माझ्यासाठी समान आदरणीय आहेत. कारण संत कोणत्या जातीमुळे नव्हे; तर त्यांच्या ज्ञान, कर्म आणि शिकवणीमुळे आदरणीय ठरतात.जातीविषयीच्या या वैचारिक भूमिकेत काही चांगले असेल; तर ते श्रेय मला तरी संतसाहित्याचे जे संस्कार माझ्यावर झाले; त्या संस्कारांचे वाटते.
             
             

गुजरात विधानसभा निवडणुक चर्चा तर होणारच

गुजरात विधानसभा निवडणूकः चर्चा तर होणारच!              डॉ. चन्द्रहास सोनपेठकर गुजरात राज्याच्या विधानसभा निवडणूका जाहीर झाल्या आहेत. मीड...