Friday, 4 November 2016

Anakalniy

अनाकलनीय .....! (लेखांक 0)
- चन्द्रहास सोनपेठकर
काही माणसांचे व्यक्तिमत्त्व मोठे चमत्कारिक असते. ते अनाकलनीय देखील असू शकते.
त्यांचे अवतीभवतीच्या लोकांना त्यांची काळजी वाटते का?
त्यांची भीती वाटते का?
या दोनही प्रश्नांचे उत्तर "हो" असेच असू शकते.
काळजी वाटते; ते अनपेक्षित वर्तन/ वर्तनबदलामुळे.
भय वाटते; ते अनाकलनीय व्यक्तित्वामुळे.
आपल्या भोवती अशी माणसे पूर्वस्मृती, स्वक्षमता आणि परिस्थिती यांचे एक असंतुलित वलय निर्माण करत असावेत. सामान्य माणसांचेही असे वलय असंतुलित असू शकेल. सामान्यतः कोणीच कायम आणि 100% संतुलितच असण्याची शक्यता कमी वाटते.  पण अनाकलनीय व्यक्तिमत्वात हे वलय अधिक गडद असण्याची शक्यता असेल.
"क्षणात हसू आणि क्षणात आसू" अशी स्थिती असते. प्राप्त परिस्थितीवर विजय मिळविण्याची यांची क्षमता असते. परिस्थितीवर विजय मिळविताना-
स्वीकार
प्रयत्न
बदल
विजय
अशा चार स्टेप्स अगदी ठळक असतात. यात 'स्वीकार' या पायरीत पूर्वस्मृती अडचण निर्माण करतात. आणि पहिली पायरी व्यवस्थित पार न पडल्याने प्रयत्न कितीही केले; तरी यश मिळणे अवघड होते. मग समोरच्याकडून अपेक्षा वाढतात. आणि प्रयत्न मंदावतात. मग बदल कसा घडणार? मग विजय कसा मिळविणार?
जगात कोणीच कोणाला 100% ओळखत नाही; याचा अर्थ कमी अधिक प्रमाणात आपण सर्वच अनाकलनीय असू शकतो. हे मी पुनरावृत्त करीत आहे.
(लेख परिपूर्ण व 100% अचूक असल्याचा दावा करण्यात आलेला नाही.)

Thursday, 13 October 2016

जातीचे वास्तव

'जातीचे वास्तव......!
- डाॅ. चन्द्रहास सोनपेठकर

            'जात' हे वास्तवच समजत असाल; तर आणखी एक वास्तव समजून घ्यायला हवं. प्रत्येक जातीत चांगले-वाईट, गरीब-श्रीमंत, प्रतिभावान-सामान्य अशा सर्वच प्रकारची माणसं असतात.
           एकाच जातीतील माणसे कधी कधी परस्परांना मदत करीत नाहीत. पण तुमच्यापेक्षा अन्य जातीची व्यक्ती तुम्हाला मदत करते.
           एखाद्या जातीची एक व्यक्ती तुम्हाला मदत करते. त्याच जातीची दुसरी व्यक्ती तुम्हाला मदत करीतही नाही. मदत करणे/नाकारणे हा व्यक्तीच्या स्वभावाचा भाग असू शकतो; जातीचा नाही.
           जात पाहून एखाद्याचा आदर/अनादर करता येणार नाही. त्यासाठी व्यक्तीचे वर्तन अधिक महत्वाचे ठरते.
           जात जात करणा-या माणसांच्या विकासाला मर्यादा असते. एका विशिष्ट टप्प्यानंतर अशा लोकांचा विकास नक्कीच थांबतो.
           राष्ट्राच्या जडणघडणीत सर्वांचे योगदान महत्त्वाचे ठरते. सर्वांना विकासाच्या संधी मिळायला हव्यात. व्यक्ती-समाज-राष्ट्र असा विकास घडणं आवश्यक आहे.
           आपण या विचारांशी सहमत असलं पाहीजे, असा आग्रह मुळीच नाही. सर्व संत माझ्यासाठी समान आदरणीय आहेत. कारण संत कोणत्या जातीमुळे नव्हे; तर त्यांच्या ज्ञान, कर्म आणि शिकवणीमुळे आदरणीय ठरतात.जातीविषयीच्या या वैचारिक भूमिकेत काही चांगले असेल; तर ते श्रेय मला तरी संतसाहित्याचे जे संस्कार माझ्यावर झाले; त्या संस्कारांचे वाटते.
             
             

Thursday, 29 September 2016

Dr. Durgade sir: An inclusive personality

मा. प्रा. डाॅ. दुर्गाडे सर: सर्वसमावेशकतेचे दुसरे नाव

गेली पाचवर्षाहून अधिक काळ आम्ही टिळक महाविद्यालयात एकत्र आहोत. अर्थात दुर्गाडे सर खूप सिनिअर आहेत. सरांची राजकारण समाजकारण अर्थकारण आणि शिक्षण या चारही क्षेत्रात जबरदस्त पकड आहे. सर्वप्रकारची यशस्विता असूनही विनम्रता असणं गुणग्राहकता असणं आणि सर्वसमावेशकता असणं या तीन गोष्टी सरांकडे अशा आहेत; ज्या कोणाच्याही मनाला सहज भावतील.
          राजकारणात सक्रिय असूनही सर विरोधासाठी विरोध कधीच करीत नाहीत. एखाद्या व्यक्तीचे एखाद्या बाबतीतील विचार  त्यांच्यापेक्षा कितीही भिन्न असले, तरीही समोरच्या व्यक्तीच्या विचारस्वातंत्र्याचा सर नेहमीच संमान करतात. कोणत्याही सकारात्मक कार्याला प्रोत्साहन देतात.
            दिवसभराचे व्यस्त असे भौतिक आणि बौद्धिक वेळापत्रक सर सांभाळतात. हे कौशल्य त्यांच्याकडून शिकलं पाहीजे. बरं इतक्या व्यस्ततेतून सर वाचनासाठी केव्हा आणि कसा वेळ काढत असतील, हे त्यांनाच माहीत!
            राजकारणात दुर्मीळ होत चाललेला साधेपणा त्यांनी जपलांय. त्यांनी समाजकारणात वैचारिक एकसूरीपणाला थारा दिलेला नाही. आर्थिक चिंतनातही डाव्या किंवा उजव्या विचाराच्या आग्रहापेक्षा संयुक्तिकतेला महत्व दिलंय. प्रबोधन, सुधारणा, बुद्धीप्रामाण्य, पुरोगामीत्व हे जसे त्यांच्या चिंतनाचे अविभाज्य भाग आहेत, तसेच कृतीचेही! पण तरीही "माझेच खरे" हा आग्रह नाही. तर "खरे ते माझे" अशी भूमिका सरांची असते.
             लोकशाही मूल्यांबद्दल त्यांच्या मनात कमालीचा आदर आहे. हे मी अनुभवाने सांगू शकतो. कारण एकूण विचार क्षेत्राच्या किमान 10% विचारांत तरी आमच्यांत मतभिन्नता असण्याची शक्यता आहे. पण तरीही सरांसोबत काम करताना, चर्चा करताना कधी दडपण येत नाही. नक्कीच; दुर्गाडे सरांनी सर्वसमावेशकता जपली आहे.....

Friday, 16 September 2016

हसायला लावणारी माणसं...!

हसायला लावणारी माणसं...!     
            हसायला लावणा-या प्रेमळ माणसांनी अशी काही साथ दिली की, वेळ फक्त हसण्यासाठीच राहीला. एखाद्या कुशल डाॅक्टर सारखं हसत हसवत हृदय बाहेर काढलं. काॅर्बोरेटर ऑईलनं साफ करावं, तसं आशीर्वाद आणि शुभेच्छांच्या स्निग्धतेने हृदय स्वच्छ केले. आणि निखळ हास्य तेवढं हृदयात ठेवलं.
        काहींनी तर जोरात हसलं पाहीजे म्हणून लडिवाळ हट्टच धरला. काहींनी हसल्यावर असे काही प्रोत्साहन दिले की, हसणं मनमुराद होऊन गेलं.
        असं वाटतं की, हसणं हे फक्त भौतिक नसतं, ते केवळ मानसिक देखील नसतं. हसणं ही हृदयाला जाणवलेल्या आध्यात्मिकतेची भौतिक अभिव्यक्ती असते. बुद्धीची खिडकी हळुवार बंद केली की, मनाचं अगदी आतलं दालन उघडतं; ते हृदय. हवं तर अंतःकरण म्हणा. ते एखाद्या कमलपुष्पासारखं असावं. त्यातून एक लहानसं कमळ उदित व्हावं; ते लहानसं कमळ म्हणजे हास्य.
        अर्थात हे समजणं थोडसं कठिण असेल. किंबहुना व्यक्त करणं कठिण असेल. पण खरं आहे.
        भगवंत म्हणजे काय? सत्वप्रधानता. तेथे विशुद्ध सात्विकता असते. मग भगवंताकडून आपले अहित कसे होईल? आपण का बरं तक्रार करीत बसतो? त्यांनी नक्कीच चांगली योजना केलेली असते. आपण अजाण असतो; त्या बद्दल.
        एक मात्र नक्की. भगवंताच्या व्यवस्थेत बिंब प्रतिबिंब भाव असतो. आरशासारखा....! जे द्याल, ते नक्कीच मिळेल.
        सहानुभूतीसाठी धडपडू नका. समानाभूतीस महत्त्व द्या. दुस-याच्या दुःखाने दुःखी आणि सुखाने सुखी व्हायला शिका.
        खरंच सांगतो, लोक नक्कीच साथ देतात. आपण विश्वास ठेवला पाहीजे- भगवंतावर, स्वतःवर आणि मित्रांवर! राजकारणाचं ठाऊक नाही; पण इतर सर्वच क्षेत्रात विश्वास ठेवता येऊ शकतो.
        हा ब्लाॅग त्या सर्वांना समर्पित; ज्यांनी हसवलंच, हसतंच रहायला लावलं. सहास्य प्रणाम; त्या लहान मोठ्या सर्वांमध्ये असणा-या चैतन्य तत्त्वाला!
        जय श्रीकृष्ण!

Thursday, 15 September 2016

यश आणि तत्त्वज्ञान

 व्यक्तीच्या यशस्वीतेत तत्त्वज्ञानाची भूमिका 

 प्रत्येक ठिकाणी फर्स्ट राहण्यापेक्षा चांगलं राहण्याचा प्रयत्न करा. फर्स्ट राहण्यासाठी स्पर्धा असेल, क्यु असेल, ईर्ष्या असेल. चांगलं राहण्यासाठी असं स्पर्धा इत्यादि काहीच नसेल. पण एक लक्षात ठेवा, तुमचा चांगुलपणा तुम्हाला अटल अद्वितीय असं स्थान देईल. ध्रुवबाळाला ओळखतंच असाल तुम्ही!
        बरं तुम्ही कितीही वेळेस स्पर्धा करून पहिलं स्थान मिळवलं तरीही कधी ना कधी ते रेकाॅर्ड मोडलं जाऊ शकतं.
        याचा अर्थ असा नाही की, यशासाठी प्रयत्न करू नयेत. यशासाठी नेहमी नेहमी प्रयत्न केलाच पाहीजे. पण तो कोणा दुस-याच्या नव्हे तर आपल्या स्वतःच्या पुढे जाण्यासाठी.
        "मी कालपेक्षा आज आणि आजच्या पेक्षा उद्या अधिक प्रज्ञावान प्रतिभावान यशस्वी असायला हवं" ही महत्वाकांक्षा माणसाला उच्चतम आणि उत्तमोत्तम यशशिखरापर्यंत घेऊन जाते.
        पण हे सारं करण्यासाठी व्यक्तीचा तात्विक पाया भक्कम असला पाहीजे. कोणतं तरी एक तत्त्वज्ञान त्याच्या जीवनाचं अविभाज्य असं अंग असलं पाहीजे. मला स्वतःला या संदर्भात योग आणि वेदांत ही दोन दर्शने महत्वाची वाटतात. योग माणसाच्या मनावर बाहेरील गोष्टींचे परिणाम थांबविण्यास शिकवितो. वेदांत मर्मदृष्टी देतो. अन्य दर्शनांची मतांची उपयुक्तता मी नाकारीत नाहीये. माझ्या अल्पशा अनुभवानुसार या दोन तत्त्वज्ञानांबद्दल मी लिहीतोय.
        स्वस्थ शरीर स्वस्थ मन योगाकडून करून घ्यावे. नि मग असे स्वस्थ मन भक्तिमय व्हावे. बुद्धीस वेदांत सिद्धान्तांचा वेध घेण्याच्या कार्यी लावावे. यातून एक तात्त्विक बैठक विकसित होते. या तात्त्विक बैठकीची यशस्वितेत एक यथार्थ भूमिका असते.
                                   (अपूर्ण)
JSK!!!

Sunday, 4 September 2016

"परस्परावलंबित्व, माणूस आणि आनंदाचा मार्ग."

"परस्परावलंबित्व, माणूस आणि आनंदाचा मार्ग."

         *मानवच काय, अगदी पशु पक्षी वनस्पती सर्वांचेच जीवन हे तसे काॅम्प्लेक्स असते. आणि याचे एक प्रमुख कारण परस्परावलंबित्व असण्याची शक्यता आहे.
         *गरजा कितीही कमी असो किंवा अधिक; त्यांची पूर्तता करण्यासाठी अन्य कोणावर तरी अवलंबून रहावे लागते.
         *उत्क्रान्तीच्या हजारो वर्षांच्या कालात सर्व जीवजंतूंना जगण्यासाठीचे परस्परावलंबित्व अंगवळणी पडले आहे. जगण्यासाठी श्वास घेणे आवश्यक आहे. आपण नित्य श्वास घेतो, न विसरता आणि म्हणूनच न आठवता देखील.
         *खरं तर या परस्परावलंबित्वाला काही लोक परावलंबित्व समजतात. पण वास्तव नाकारणं चूक होय. ऊलट आपण सर्वांना अधिकाधिक सहकार्य केले तर परस्परावलंबित्वात सहजता येते.
         *परावलंबित्वाचे वर्णन परस्परावलंबित्व असे केले पाहीजे. तुम्हाला न मागता मदत मिळेल असा प्रयत्न करा. ही सृष्टी तुम्ही जे द्याल ते तुम्हाला परत देणारंय. जिथून आज सहकार्य मिळाले नाही, तेथूनही उद्या लाभू शकते.
         *विज्ञान तंत्रज्ञानाने चहाचे यंत्र तयार केले. पण यंत्र बिघडल्यावर काय? नीट करण्यासाठी कोणाला तरी बोलवावे लागते. तेव्हा एकंदरच निसर्ग आणि मानव तसेच व्यक्ती व समाज यांच्यात एक परस्परावलंबित्व असते. ते अनिवार्य म्हणजे ज्याचे निवारण होऊ शकत नाही, असे असते.
         *सारांश, परस्परावलंबित्व नैसर्गिक आहे. त्याचा आदर करा. 'मै' ची जागा 'हम' ला द्या. स्वतःत किंवा अन्य कोणातही चूक पाहण्यापेक्षा बरोबर काय ते आपल्याला आधी दिसलं पाहीजे. बरोबर असणारा भाग वाढवत नेला की, चूकीचा भाग आपोआप कमी होतो.
         *खरं तर परस्परावलंबित्वामुळे माणूस दुःखी नाही. लोकांनी माझ्या अनुकूल तेच केले पाहीजे या हट्टामुळे माणूस दुःखी आहे. प्रत्येक जागी अनुकूल मार्ग मिळतो म्हणून नदी सागरापर्यंत पोचत नाही. पर्वत, द-या खोरे यांविषयी सद्भावना, ध्येयवाद, संयम आणि चिकाटी यांच्या सहाय्याने नदीला फायनल डेस्टिनेशनपर्यंत पोचता येते.
         *नगर निगमने पाणी सोडलं तर मला पाणी मिळेल, हे समजून घेता. पाऊस पडला तर पाणी मिळेल हे समजून घेता. भगवंताने कृपा केली, तर मला पाणी मिळेल, हे देखील समजून घ्यायला हवे ना? भगवंतावर आपला विश्वास असला पाहीजे ना? आपण भगवंतावर अवलंबून आहोत; हे समजून घ्यायला हवे ना?
         *माणसासाठी किती छान आहे की, तो नामस्मरण करू शकतो. सर्व विचार बाजूला ठेवा. एकाग्र व्हा. नामस्मरण करा. नामस्मरणाचा कल्पवृक्ष उपलब्ध आहे, या पेक्षा काय हवे? नामस्मरण हाच आनंदाचा यशाचा सोपा मार्ग आहे, असे मला तरी वाटते.

Friday, 26 August 2016

'सवय'

'सवय'

'सवय' हा शब्द मराठीत संस्कृतातील 'सव्य' या शब्दापासून तद्भव रूपात आला असावा. सव्य शब्दाचा सामान्य अर्थ नेहमीप्रमाणे as usual असा होतो.
         सवय हा शब्द मराठीत आल्यावर त्याचा थोडा उत्कर्ष झाला आहे. त्याचा संबंध काहीसा मनाशी जोडला गेलाय. अशी परिस्थिती जी वारंवार म्हणजे नेहमीप्रमाणे सहज घडून येते त्यातून मनाची काही एक अपेक्षा त्याबाबत तयार होते, ही प्रक्रिया 'सवय' या संज्ञेत तयार होते.
         सवय म्हणजे काय, हे समजल्यानंतर पुढचा प्रश्न; कोणतीही सवय वाईट असते का? याचे उत्तर असे की, 'सवय' हा मनःस्थिती आणि परिस्थितीचा एकत्रित परिणाम असतो.  Its result or outcome of  particular cause/s. तो चांगला किंवा वाईट हे त्या सवयीच्या स्वरूपावर अवलंबून असते.
         सवयीचे प्रमाण जेव्हा खूप वाढते; तेव्हा ते व्यसन होते. संस्कृतात तर संकट या अर्थी व्यसन शब्द उपयोजिला जातो. तेव्हा व्यसन मात्र वाईटच!
         त्यानंतरचा प्रश्न सवय दूर कशी करावी? तर आपण सवयीचे प्रमाण नियंत्रित करावे. आणि हे सहज शक्य आहे. फक्त एक लक्षणीय की, मन सकारात्मक आज्ञा लवकर ऐकते.

Tuesday, 23 August 2016

प्रो. डा. जतीन्द्रमोहन मिश्रा- प्रभावी व्यक्तित्व के धनी।

'' प्रो. डा. जतीन्द्रमोहन मिश्रा- प्रभावी व्यक्तित्व के धनी।''
- डा. चन्द्रहास शास्त्री सोनपेठकर
आदरणीय प्रो. डाॅ. जतीन्द्रमोहन मिश्रा सर से मेरा परिचय लगभग दस साल से है। ज्ञान की आभा तथा वाणी की मधुरता उनके व्यक्तित्व में समाहित है। यतियों के मुखियां भी मानों मिश्रा सर के वक्तृत्व पर मोहित होते हैं।
         मिश्रा सर आज एन सी ई आर टी संस्था मे सहयोगी प्राध्यापक हैं। हाल ही में उन्होंने संस्कृत राष्ट्रीय संगोष्ठी का सफल आयोजन किया । इस दौरान वह न तो थके हुंए दिखे न ही रुके हुंए । बस् व्यस्त अवश्य थे।
         इस संगोष्ठी में मै सहभागी होना चाहता हूं, यह सुनकर प्रसन्न हुंए । मेरा संशोधन संस्कृत अभिरुचि को लेकर है, यह सुनकर तो अतीव प्रसन्न हुंए । मुझे मार्गदर्शी सूचनाएँ भी दी। उनके साथ संवाद करते समय ऐसा लगता है, जैसे हमें अभी बहूत कुछ सिखना हैं।
         यह न केवल मेरा अपितु अनेक लोगों का अनुभव होगा। शांतचेतस् रहते हैं। यतीन्द्र जो ठहरें।
         कठिन परिश्रम करते है। कर्मठ है। सुहास्यवदन है। सदैव अपने मित्रों को कार्य करने हेतु प्रेरित करते है, मार्गदर्शन करते है। अनुशासनप्रिय है। तथा समायोजन कुशल भी है।
         संगोष्ठी के तीन दिन तथा उससे पूर्व एक माह तक उन्होंने जो परिश्रम की पराकाष्ठा की, वह तो अद्वितीय थी। हर एक प्रतिभागी उनके बारे मे बोलने के लिए लालायित था। सामनेवालेका मन जितकर कैसे कार्यक्रम सफल बनाए, यह कोई उनसे ही सिखे।
         समादरणीय प्रो. डा. मिश्रा सर का स्नेह ऐसे ही मिलता रहें, उनसे हम जिज्ञासा, विनम्रता एवं यशस्विता का पाठ पढ़ते रहें, सरजी और भी अनेकानेक उच्च स्थान विभूषित करें, इसी मंगलकामना के साथ;
          जय श्रीकृष्ण!!!

Monday, 15 August 2016

प्रेरणेचा झरा....!

प्रेरणेचा झरा....!
     - चन्द्रहास
           खरंच, काही व्यक्तिमत्त्वं ग्रेटच असतात. त्यांचं स्वप्न, त्यांचं ध्येय, बोलणं, वागणं त्या ध्येयासाठीची तपश्चर्या अद्वितीयच असते.
           मी तेव्हा पदवी शिक्षण घेत होतो. माझ्या एका मित्राने 'चाणक्य' चं मासिक आणलं. तो स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. मला ते मासिक पाहताक्षणी आवडलं. मग वाचलं. आणि अनेक कुतुहलं मनात तयार झाली. जिज्ञासेचा उदय झाला. आदरणीय अविनाश धर्माधिकारी सरांबद्दल एका प्राकृतिक आदराची रूपरेखा सिद्ध होण्याचा तो क्षण होता. लहानपणापासूनचा माझा एक रेकाॅर्ड आहे, मला ज्या व्यक्तिमत्त्वाबद्दल कुतुहल वाटतं, जिज्ञासा असते; त्यांचा आणि माझा कुठेतरी संबंध येतो. कधी लवकर, कधी ऊशीरा.
           मासिक वाचलं. त्यानंतर लोकसभेचं इलेक्शन आलं. बातम्या आल्या. वाचल्या. कुतुहल आणखी वाढलं. नंतर काही वर्षांनी आदरणीय सरांची मुलाखत पाहिली. ऐकली. भारावून गेलो. बहुतेक ती मुलाखतही समीरण यांनीच घेतली असावी.
           त्यानंतर वर्ष 2011, मी टिळक शिक्षण महाविद्यालयात जाॅईन झालो. त्याच इमारतीत संध्याकाळी 'चाणक्य-'चे तास संपन्न होतात. म्हणजे आधी कुतुहल मग जिज्ञासा आणि नंतर संबंध हे रेकाॅर्ड मोडलं नाही, नियतीनं.
           2012 ऑक्टोबर, शिक्षक शिक्षणातील सर्वोत्कृष्टता या परिषदेत आदरणीय सरांचे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळाले. "शिक्षकाची सर्वोत्कृष्टता त्याच्या आई/माऊली होण्यात आहे." हे आदरणीय सरांचे वाक्य धमण्यांमध्ये भिनलंच जणु.
           नंतर 2013, गॅदरिंग महोत्सवातलं आदरणीय सरांचं भाषण, मला मिळालेली निवेदनाची संधी मी विसरू शकत नाही.
           याच दरम्यान हिंमत केली. फेसबुकवर रिक्वेस्ट पाठवली. स्वीकारतील की नाही; ह्याबद्दल शंका होती. पण पाठवली. सरांनी रिक्वेस्ट स्वीकारली. खरं तर एवढ्यावर मी समाधानी होतो; आनंदी होतो.
           मी Sanskrit is my heart! या शीर्षकाचा ब्लाॅग सुरू केला. त्या ब्लाॅगपोस्ट्सला "आवड आणि प्रतिक्रिया" या रूपात आशीर्वाद मिळू लागले. संस्कृत छन्दोबद्ध रचना त्यात मुख्यत्त्वे असतात. आज एकूण रचना अनेक झाल्या. त्यात सरांचे आशीर्वाद लाभले की, आपण योग्य मार्गावर असल्याची जाणीव होते.
           कोणत्याही अॅक्टिव्हिटीला सरांचे आशीर्वाद लाभतात. सूर्याने काजव्याला शाबासकी दिली; तर काजव्याला किती आनंद होईल! अशीच ही अनुभूती आहे.
           काल जय महाराष्ट्रवर मुलाखत पाहिली, ऐकली. संस्कृतात मुलाखतीला ' साक्षात्कार ' असा शब्द आहे. किती छान शब्द! तर या मुलाखतीचा प्रारंभच समीरणने खूप सुंदर केला. सुंदर यासाठी की, माझ्याच भावना समीरण बोलत होते; असं वाटलं. सर अनेकानेक तरुणांचे कसे प्रेरणास्थान आहेत, ते कसं प्रोत्साहन देतात; कौतुक करतात या बद्दल मला जे वाटतं; तेच एका सिद्धहस्त पत्रकाराला वाटतं, याचा एक आनंद वाटला. एखाद्या गायकाची मेहफिल रंगत जावी, तशी कालची मुलाखत होती.
           या मुलाखतीतून काय उलगडलं, हे एका वाक्यात सांगायचं तर आदरणीय सरांचा अस्खलित ध्येयवाद आणि अखंड तपश्चर्या यांचा बोध झाला.
           संस्कृत सुभाषितकाराने वक्तृत्वाचे चार प्रकार सांगीतले आहेतः
           उद्बोधक
           प्रेरक
           रंजक
           ज्ञानद
           पुढे सुभाषितकार म्हणतो; एकाच वक्तृत्वात ह्या चारही प्रकारांचा योग असणे दुर्लभ आहे. सरांच्या वक्तृत्वात हे एकत्रिकरण साधलंय. चर्चेत असो, भाषणात असो किंवा अगदी लहानशा कमेंटमध्ये असो, ठामपणा असतो. नेमकेपणा असतो. कमीत कमी व सोप्या शब्दात आपल्याला स्टॅन्ड लक्षात येतो.
           इतिहास तोच असतो, जसं सृष्टी तीच असते. कोणी त्यात सौन्दर्यस्थळं शोधतो, कोणी राष्ट्र नि संस्कृतीचा जाज्ज्वल्य अभिमान, कोणी आणखी काही. धर्माधिकारी सर त्यात राष्ट्र नि संस्कृतीचा जाज्ज्वल्य अभिमान आणि माणसाचा उत्कर्ष शोधतात नि मांडतात. मी सरांच्या व्यक्तित्त्वाकडे आकर्षित होण्याचं गमक यात असण्याची शक्यता प्रकर्षाने अधिक वाटते.
           माणूस प्रभावी कशामुळे ठरतो? शक्तिसंपन्नतेमुळे. सर्वात प्रभावी शक्ती कोणती? इच्छाशक्ती किंवा संकल्पशक्ती. जी उपनिषद् काळात नचिकेताकडे होती. स्वामी विवेकानंदांनाही जग बदलायला 100 नचिकेता हवे होते. सरांचीही इच्छाशक्ती संकल्पशक्ती प्रचंड असल्याचे जाणवते.
           अटलजींच्या कवितांमध्ये जो उज्ज्वल आशावाद प्रतिबिंबित होतो, तोच सरांच्या वक्तृत्वात, नेतृत्वात आणि कर्तृत्वात दिसून येतो. तसंही अटल आणि अविनाश हे दोन शब्द अर्थदृष्ट्या निकटतम आहेत.
           सरांनी अशाच प्रकारे भारतमातेची सेवा करत रहावी. आमच्या सारख्यांवर प्रोत्साहन, प्रेरणा आणि आशीर्वाद यांची वृष्टी करून या महान सृष्टीचं ऋण अंशतः तरी फेडण्याची आमची क्षमता विकसित करावी; हीच जगदंबचरणारविन्दी प्रार्थना।
           इति लेखनसीमा।

Sunday, 14 August 2016

सुखाचं गणित

सुखाचं गणित

गणित कितीही अवघड असो, सोपं असो किंवा लहान मोठं असो; ते फक्त 0 1 2 3 4 5 6 7 8 9 या दहा अंकांभोवतीच भ्रमत असतं. माणसाचंही असंच असतं.
         बहुतेक प्रत्येक माणसाकडे एक अतिशय प्रभावी अशी क्षमता असते आणि एक तशीच समस्या. अन्य + & - बाबी या ती क्षमता आणि ती समस्या या भोवतीच असतात. साहजिकच समस्या कोणालाच नको असते. आणि क्षमता हवी असते. समस्या क्षीण व्हावी. तिचं निराकरण व्हावं आणि क्षमतेचा विकास व्हावा; असं प्रत्येकाला वाटत असतं.
            त्या वाटण्यात काही चूकही नाही. अगदी सिंह इत्यादि प्राणी पशु पक्षी सर्वांना असंच वाटत असावं. पण दर वर्षी पावसाळा येत असूनही कावळा घरटं बांधत नाही. तो त्रास स्वीकारतो पण आळस सोडत नाही. आळस हा त्याच्या स्वभावाचा म्हणा किंवा सवयीचा म्हणा भाग असतो. तीच त्याची खरी समस्या असते.
            असा सवयीचा भाग सहसा बदलत नाही. बरं माणूस स्वतः बदलत नाही आणि समोरच्या कडून बदलाची अपेक्षा करतो. या गोष्टीचं आश्चर्य करावं तितकं कमीच!
            माणसाला बहुतेक करून अधिक बुद्धीमान प्राणी मानले जाते. पण नेमकी क्षमता आणि नेमकी समस्या ओळखण्यात माणूसही कमी पडण्याची शक्यता असते. कधी अहंकार, कधी भूतकालाचं ओझं यामुळे नेमकेपणानं विचार करण्यात माणसाला अडचणी येतात.
            कोणत्याही माणसाला समस्या शक्य तितक्या लवकर निराकृत म्हणजे नाहीशी व्हावे, असे वाटते. सेल्फी, फेसबुक नि व्हाॅट्सॅपच्या या काळात virtual world चा scope वाढतोय. समस्या ही व्याधीसारखी असते. मूळापासून नाहीशी व्हायला वेळ लागणार. "एक बटन क्लिक करा; समस्या गायब" असं होत नसतं.
            न थांबता चालत राहणे; हा अनेक समस्यांवरील चांगला उपाय ठरू शकतो.
            कधी क्षमता तर कधी समस्या वरचढ ठरते. जेव्हा समस्या वरचढ ठरते, तेव्हा श्रद्धा, विचार हे औषध माणसाला जगवते. क्षमता वरचढ ठरते, तेव्हा अहंकार, क्रोध इनसे परहेज करें. यांपासून दूर राहता आलं, तर समस्या लवकर परत येऊ शकत नाही.
            अगदी अडचणीच्या कालातही अहंकार इ.मुळे समस्या संपत नाही; तर वाढते.
            अंकांची चलबिचल होते, तसं गणिताचं उत्तर बदलतं; सूत्र नाही. जीवनही भूमितीमधील त्रिकोण, चौकोनासारखे काटेकोर नसते. आकडे बदलतात म्हणून Mean बदलतो, पण प्राप्तांकांची बेरीज भागिले एकूण संख्या हे सूत्र बदलत नाही.
            भूतकालातील सुखाच्या प्रमाणाचं ओझं घेऊन माणूस विचलित तेवढा होऊ शकतो. भूतकालातील सुख अधिक असो वा दुःख अधिक असो; त्यामुळे वर्तमानातील समायोजनात ऋण फरक पडण्याचीच शक्यता अधिक असते.
           
            सगळं गणित मजेशीर, तटस्थपणे पाहील त्याला. सगळंच गणित अवघड काहीशा समजूतदार माणसाला. आणि सगळंच गणित सोपं ज्याला कळत नाही, त्याला.
            तेव्हा जीवनात आनंदी रहायचं असेल; तर ज्ञान वाढवा. समजूतदार असूनही आनंदी राहण्यासाठी श्रद्धा वाढवा आणि सुखी राहण्यासाठी अज्ञानाचा (काही बाबतीत) वर्ग करा.
            जय श्रीकृष्ण।।

Wednesday, 10 August 2016

Stand with 'self'

लढा, पण 'स्व'-च्या बाजूने....!!!
राजस्थानात वाळूच्या टेकडीवरही एखादं रोपटं वाढलेलं दिसतं. ते अबोल रोपटं परिस्थितीवर मात करू शकतं; तर माणूस का नाही?
नक्कीच! माणूसही परिस्थितीवर मात करू शकतो. फक्त त्याने स्वतःला जपलं पाहीजे. स्वतःच्या चारित्र्याला, निष्ठेला, कर्तव्याला जपलं पाहीजे.
स्व आणि परिस्थिती यात संघर्ष होऊ द्या. तुम्ही स्व च्या बाजूने लढा. परिस्थिती बदलणार!
प्रतिकूलतेची परिसीमा गाठल्यावर परिस्थितीची वाटचाल अनुकूलतेकडे होणारंय.
बाह्य पदार्थ माणसावर इतके परिणाम करतात की, तो आपली खरी शक्ती विसरून जातो, ही माणसाच्या दृष्टीने खरी समस्या आहे. माणूस आपल्या शक्तीचे खरे रूप जाणतो का?
का बरं माणूस स्वतःच्या दुःखाचा आणि दुस-याच्या सुखाचा इतका विचार करतो? एकदा हे चित्र ऊलट करा. दुस-याच्या दुःखाचा विचार करा. स्वतःच्या सुखाचा विचार करा.
जय श्रीकृष्ण।।

Wednesday, 3 August 2016

चला, माणूस होऊ या.

चला, माणूस होऊ या.
© डा. चन्द्रहास सोनपेठकर

"केवळ स्वतः नाही, आपल्या समवेतची प्रत्येक व्यक्ती आनंदी असायला हवी." असं ज्याला वाटतं तो माणूस.

पण माणसाच्या या माझ्या व्याख्येत जगातील किती टक्के मनुष्याकृती प्राणी येतील, प्रश्नच आहे. खरं तर भगवंताची सर्वात सुंदर कलाकृती म्हणजे माणूस. पण
किती त-हा आहेत, या माणसाच्या?
काही तर कसे कुणाला दुखावता येईल, म्हणून टपलेले. त्यांचे विषयी विचार करणे म्हणजे चित्त मलीन करून घेणे.

काही दुखावत नाहीत, पण स्वार्थासाठी अंध झालेले.

साध्या राहण्यापेक्षा साध्या बोलण्यावर विश्वास ठेवायला हवा. साधं म्हणजे सरल पण कोणाचंही मन दुखावलं जाणार नाही, असं बोलणं. हे साधं बोलता येणं सोपं नाही. त्यासाठी तुम्ही माणूसच असावं लागतं. मैथिलीशरण म्हणतात तसे; मानवच आहे की, तो आपल्या कृतीने देव आणि दानव काहीही होऊ शकतो.

दुस-याला आनंदी पाहता न येणं दानवाचं लक्षण.
समवेतची प्रत्येक व्यक्ती आनंदी असायला हवी; असं वाटणं मानवाचं लक्षण.
न्याय करणं हे देवाचं लक्षण.
क्षमा करून व्यक्तीच्या आनंदासाठी प्रयत्न करणं; हे संताचं लक्षण.

कधी कधी वाटतं वय मोजता येतं, वाढ मोजता येते. मानसशास्त्रीय चाचण्या वापरून विकासाचा अंदाज घेता येतो. पण माणूसपणाचं काय? काही तरी एकक असायला हवं होतं. पण तरीही मननात् मानवः। म्हणजे मनन करणे, सखोल विचार करणे हेच खरं माणूसपणाचं व्यवच्छेदक लक्षण मानलं पाहीजे.

पैसा, स्थिरता किंवा समोर उपस्थित असलेल्या व्यक्तीपेक्षा एखादी भौतिक बाजू आपली भक्कम आहे, म्हणून अहंकार करणारी शेकडो माणसं दिसतात. तेव्हा वाटतं; किती मोठा टप्पा पार करायचायं माणूस होण्यासाठी.

दैवी समाजाचं स्वप्न पाहणा-या योगी अरविंदांची, समतेचा संदेश देणा-या संतांची, सुधारकांची, व्यक्ति स्वातंत्र्याचा पुरस्कार करणा-या स्मिथची माफी कशी मागावी, हेच समजत नाही.

चला, परस्परांना माणूस होण्यासाठी शुभेच्छा देऊ या.
जय श्रीकृष्ण!

Sunday, 24 July 2016

ज्याला जिंकायचंय, तो जिंकतोच!

ज्याला जिंकायचंय, तो जिंकतोच!
- डॉ. चन्द्रहास सोनपेठकर

ज्याला जिंकायचंय, तो जिंकतोच! ज्याला जिंकायचं नाही, तो कारणे देतो. आणि ज्याला जिंकायचच आहे, तो एखादी लढाई हरली तरी युद्ध मात्र जिंकतोच!
        ध्येय मोठे असणे ही चांगली बाब आहे. ध्येय व्यापक असणे हे उत्कृष्टतेचे पहिले लक्षण आहे. स्वतःच स्वतःच्या यशासाठी प्रयत्न करणे या पेक्षा अधिकाधिक माणसांनी परस्परांच्या यशासाठी प्रयत्न केले, तर आनंद वाढतो. श्रम कमी जाणवतात.
          Team work experience is really joyful always.
          आपण माणूस आहोत. आपल्याला नेहमी उत्कृष्टतेचा ध्यास असावा. खरी स्पर्धा आपली आपल्याशी आहे. कालच्या पेक्षा मी आज अधिक उत्तम असावे.
          जिंकण्याचा एक प्रयत्न असतो. तो एक प्रवास असतो. शुभाः सन्तु पन्थानः।

Friday, 22 July 2016

Dr. Chandrhas Sonpethkar's Speech for School Students

(Here is the summary of Dr. Chandrhas Sonpethkar's recent speech before School Students)


"Respected dignitaries on the dais, Honourable Principal madam, Vice Principal madam, all of teachers, staff members and my little angels, Good afternoon everybody.
First of all, Many many congratulations for your success in various competitions. Friends, your presentations won my heart really. It is my faith that school is the most holy place in the world. Because, the children studying in the school are very innocent. They have sinless hearts. And so atmosphere in the scho...ol becomes divine.
Friends, I want to add more that it is harder to speak or teach to school students than college. School students pay attention keenly. Here, I decided not to teach you friends, I just want to communicate with you. You are luckier about your education because you are studying in well-known, reputed and successful institution like Silver Crest School. I am watching future IAS officers, Doctors, Engineers, Officers, Farmers, Industrialists and Politicians among you. I know your potentials. You can achieve what you aim or what is in your mind. The success is waiting for you. Nothing is impossible for you. You are going to win definitely. The history of students is very bright in the world. And in India, it is fully inspirational!
Friends, Indian philosophy says,
Who is the great teacher? What are the criteria for a great teacher?
If the student wins over his teacher, the teacher is great!
Shishyadichhet parajayam.
Indian culture and philosophy focus on development of student’s personality, shaping behaviour. In easy language, we can discuss them as-
• Students, you should have balance in your each behaviour including your meal, your speech, your communication, your sleep, your study etc.
• Students, you should not worry and feel fear. Because these two things take you away from the success.
• Students, you should dream. You should have aims. Dreams and aims are your best friends. They bring you near to success.
• Students, you should try and not to stop your attempts until you do not achieve the goal. Thakana, Rukna, thahraana nahi chalna aur aage badhna hi aapka karya hai!
In the end, I wish you a big success in your life. I wish you a successful, healthy and happy life.
I express my gratitude towards honourable Principal of the school, I am thankful to Vice Principal, teachers including my little brother Rishiraj that they made opportunity available for me to communicate with you. Thank you very much!”
– Dr. Chandrhas D. Sonpethkar
Prize ceremony, Silver Crest School, Pune
19/07/2016

गुजरात विधानसभा निवडणुक चर्चा तर होणारच

गुजरात विधानसभा निवडणूकः चर्चा तर होणारच!              डॉ. चन्द्रहास सोनपेठकर गुजरात राज्याच्या विधानसभा निवडणूका जाहीर झाल्या आहेत. मीड...