Friday, 4 November 2016

Anakalniy

अनाकलनीय .....! (लेखांक 0)
- चन्द्रहास सोनपेठकर
काही माणसांचे व्यक्तिमत्त्व मोठे चमत्कारिक असते. ते अनाकलनीय देखील असू शकते.
त्यांचे अवतीभवतीच्या लोकांना त्यांची काळजी वाटते का?
त्यांची भीती वाटते का?
या दोनही प्रश्नांचे उत्तर "हो" असेच असू शकते.
काळजी वाटते; ते अनपेक्षित वर्तन/ वर्तनबदलामुळे.
भय वाटते; ते अनाकलनीय व्यक्तित्वामुळे.
आपल्या भोवती अशी माणसे पूर्वस्मृती, स्वक्षमता आणि परिस्थिती यांचे एक असंतुलित वलय निर्माण करत असावेत. सामान्य माणसांचेही असे वलय असंतुलित असू शकेल. सामान्यतः कोणीच कायम आणि 100% संतुलितच असण्याची शक्यता कमी वाटते.  पण अनाकलनीय व्यक्तिमत्वात हे वलय अधिक गडद असण्याची शक्यता असेल.
"क्षणात हसू आणि क्षणात आसू" अशी स्थिती असते. प्राप्त परिस्थितीवर विजय मिळविण्याची यांची क्षमता असते. परिस्थितीवर विजय मिळविताना-
स्वीकार
प्रयत्न
बदल
विजय
अशा चार स्टेप्स अगदी ठळक असतात. यात 'स्वीकार' या पायरीत पूर्वस्मृती अडचण निर्माण करतात. आणि पहिली पायरी व्यवस्थित पार न पडल्याने प्रयत्न कितीही केले; तरी यश मिळणे अवघड होते. मग समोरच्याकडून अपेक्षा वाढतात. आणि प्रयत्न मंदावतात. मग बदल कसा घडणार? मग विजय कसा मिळविणार?
जगात कोणीच कोणाला 100% ओळखत नाही; याचा अर्थ कमी अधिक प्रमाणात आपण सर्वच अनाकलनीय असू शकतो. हे मी पुनरावृत्त करीत आहे.
(लेख परिपूर्ण व 100% अचूक असल्याचा दावा करण्यात आलेला नाही.)

गुजरात विधानसभा निवडणुक चर्चा तर होणारच

गुजरात विधानसभा निवडणूकः चर्चा तर होणारच!              डॉ. चन्द्रहास सोनपेठकर गुजरात राज्याच्या विधानसभा निवडणूका जाहीर झाल्या आहेत. मीड...