'सवय'
'सवय' हा शब्द मराठीत संस्कृतातील 'सव्य' या शब्दापासून तद्भव रूपात आला असावा. सव्य शब्दाचा सामान्य अर्थ नेहमीप्रमाणे as usual असा होतो.
सवय हा शब्द मराठीत आल्यावर त्याचा थोडा उत्कर्ष झाला आहे. त्याचा संबंध काहीसा मनाशी जोडला गेलाय. अशी परिस्थिती जी वारंवार म्हणजे नेहमीप्रमाणे सहज घडून येते त्यातून मनाची काही एक अपेक्षा त्याबाबत तयार होते, ही प्रक्रिया 'सवय' या संज्ञेत तयार होते.
सवय म्हणजे काय, हे समजल्यानंतर पुढचा प्रश्न; कोणतीही सवय वाईट असते का? याचे उत्तर असे की, 'सवय' हा मनःस्थिती आणि परिस्थितीचा एकत्रित परिणाम असतो. Its result or outcome of particular cause/s. तो चांगला किंवा वाईट हे त्या सवयीच्या स्वरूपावर अवलंबून असते.
सवयीचे प्रमाण जेव्हा खूप वाढते; तेव्हा ते व्यसन होते. संस्कृतात तर संकट या अर्थी व्यसन शब्द उपयोजिला जातो. तेव्हा व्यसन मात्र वाईटच!
त्यानंतरचा प्रश्न सवय दूर कशी करावी? तर आपण सवयीचे प्रमाण नियंत्रित करावे. आणि हे सहज शक्य आहे. फक्त एक लक्षणीय की, मन सकारात्मक आज्ञा लवकर ऐकते.